Featured

शिल्पकार तूच आहेस तुझ्या जीवनाचा!

veena_ganesh[1]कोण्या एका नगरीत एक शिल्पकार होता. तो स्वतः दगडातून सुंदर मूर्ती बनवायचा. आपल्या घडवलेल्या त्या कलाकृती घेऊन एकदा तो राजाकडे गेला. आपली सगळी शिल्पे त्याने दरबारात प्रस्तुत केली. त्याच्या अप्रतिम कलाविष्कारावर सारा दरबार बेहद खूष झाला. राजाने त्या शिल्पकारास यथोचित भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि विचारलं, “ओबडधोबड दगडातून इतकी सुंदर शिल्पे तू कशी बनवलीस”? राजाच्या प्रश्नावर शिल्पकाराने नम्रपणे उत्तर दिले, “महाराज, मी फारसे काहीच केलेले नाही. प्रत्येक दगड वरून ओबड-धोबड दिसतो खरा; पण त्याच्यात कुठेतरी छानसं शिल्प हे लपलेलं असतं. मी फक्त दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला आणि आपोआप त्याच्या अंतर्यामी दडलेलं शिल्प दृश्य स्वरूपात प्रगट झालं, इतकंच!”

Continue reading “शिल्पकार तूच आहेस तुझ्या जीवनाचा!”

फँटम ऑफ द ऑपेरा

phantom-of-the-opera‘लॉट ६६६ देन, अ शांडलिअर इन पिसेस…’
काळाच्या पटलावर कधी वैभवशाली, संपन्नतेच्या खुणा मिरवणारं परंतु, आज रोजी इतिहासजमा झालेल्या जुन्या ऑपेरा हाऊसमध्ये चाललेला लिलाव… जवळच असणारं (तात्पुरत्या डागडुजीनं पुनरुज्जित केलेलं) मोठं झुंबर… त्या झुंबराची कहाणी, थेट तिथे जुळते जेव्हा त्या ऑपेरा हाऊसमधल्या कोण्या एका भूताच्या कहाण्या सांगितल्या जायच्या, ज्याचं गूढ कधी पूर्ण उलगडलंच नाही… असं ते झुंबर… अचानक त्याच्या पूर्वाश्रमीच्या श्रीमंतीची झलक देत प्रकाशमान व्हावं आणि उपस्थितांची मने आवेगाने पार भूतकाळात निघावीत… जणू एकेकाळच्या मनात जपलेल्या सोनेरी आठवणींत… सभागृहातला लाईव्ह ऑर्केस्ट्रा एकदिलाने चालू व्हावा आणि भारीत संगीत मनाचा ताबा घेत जावं…

Continue reading “फँटम ऑफ द ऑपेरा”

माळरानीचा सूर्य

माळरानावरचा सूर्यएखाद्या सकाळी उठल्यावर आजूबाजूला काही वेगळंच दिसावं… म्हणजे खोली नेहमीची आहे पण त्यात एक प्रकाश भरून राहिलाय… जणू वाट पाहात आपण जागं होण्याची… पलंगाबाजूची खिडकी हलकेच किलकिलतेय… उठून आपण त्या खिडकीशी थबकावं आणि बाहेर एक अलग दुनिया उभी… अगदी त्या स्वप्नातल्या गावासारखी! गाव कसलं, माळरानच ते, झुळझुळतं, मुक्त, असंख्य पानं, फुलं आणि त्या फुलांवर धम्म किरणं फैलावत आसमंतात अलगद भरून राहणारा तो आकाशतारा, सूर्य !!

Continue reading “माळरानीचा सूर्य”

वृत्त सुमने

शाळेत असताना काट्यांच्या त्रास सोडला तर कोरांटी मला आवडायची. एकतर कमी पाण्यावर आणि कुठेही उगवणारी काटक. जाई, जुई, सायली, मोगरा या श्वेत, सुवासिक फुलांत बिनवासाची असली तरी जांभळी, गुलाबी, पिवळी कोरांटी सुंदर रंग भरायची. त्यातच मरवा माळला की रंगगंधानी सजायचा गजरा. अबोलीही शुभ्र कळ्यांत रंग देऊन द्यायची. तर्जनी आणि मधलं बोट वापरून असा गुंफत गाठींचा गजरा मी शेजारच्या बोरकर आजींकडून शिकले… तर अशी आठवणीतली कोरांटी अनेक दिवसांनी इथे वृत्तांच्या निमित्ताने पुन्हा भेटली.

Continue reading “वृत्त सुमने”

छंद मराठी बंध मराठी

Chhand_Marathi_Bandh_Marathi“सूर्य म्हणजे ना, तो एक अग्नीचा गोळा असतो.”
“हो? ‘अग्नी’चा? बापरे!”
“होS”
माझ्या स्वरातलं आश्चर्य लक्षात न येऊन लेकीनं जोरदार होकार भरला.
“पण तू ते इंग्रजीत कसं सांगितलंस शाळेत? म्हणजे ‘अग्नीचा गोळा’ हा शब्दप्रयोग तू इंग्रजीत कसा व्यक्त केलास?” (अचंबित) मी प्रश्न टाकला.
“अं… Sun is like a fire ball… असं सांगितलं मी”… एरवी मराठीचा आग्रह धरणारी आई आज चक्क इंग्रजीत सांगायला का सांगतेय असं वाटून खांदे उडवत लेक म्हणाली.
Continue reading “छंद मराठी बंध मराठी”

Festive

नवरात्री… अंगणातल्या झेंडूला भरभरून बहर. दसऱ्याच्या दिवशी तर ऊतू आल्यासारखी. झेंडूच्या वासाखेरीज दसऱ्याची सकाळ वाटतंच नाही. टोपल्यांनी वेचला पहाटे, तरी फुललेल्या बागेची परडी तशीच! भरगच्चं हार, सगळीकडची पूजा करून वर एक छोटी बास्केट ती ऑफिसमध्ये नेली. सहकारी मैत्रिणींनी उत्साहाने खोलीच्या सगळ्या खिडक्यांमध्ये झेंडूच्या माळा ठेवल्याप्रमाणे सजवली, फुलांची रांगोळी काढली. बॉसने कुतूहलाने फोटो काढले. आजूबाजूचे देशी लोकही खूष… Feeling festive!

Continue reading “Festive”

लिलिपुट कहाणी

तप्त उन्हाच्या असह्य लाटा… दूरवर फक्त भुरभुरीत माती. जीवाची काहिली थांबवायला जमिनीत कुठे गडप व्हावं पण आज ते ही शक्य नाहीये… नुसतीच लाही लाही… म्हणायला परिसरात एकच झाड… त्याची पाने पिवळी आणि शुष्क… मुळे कशीबशी तग धरून राहिलेली. सहारा आता त्या वरच्याचाच… राणीचा तर पत्ताही लागणं अवघड झालं होतं. तहानलेल्या, भाजणाऱ्या देहाने कमी का भटकंती केली होती तिच्या शोधार्थ? पण पदरी निराशाच. आता जीवात जीव असेपर्यंत या नश्वर देहातून उरलेल्या इच्छाशक्तीवर वंश जपावा ही कामना, प्रार्थना करण्यापलिकडे उरलं तरी काय होतं?

Continue reading “लिलिपुट कहाणी”

बाग

बागेची मनापासून आवड असणाऱ्यांना भारत आणि अमेरिकेतला मोठा फरक जाणवतो तो हिवाळा आला की. फुललेली बाग, शिशिराची पानगळ, गारठवणारी थंडी ते बर्फाच्छादित असं बदलत जाणारं हवामानरूप सरून पुन्हा वसंत जेव्हा पालवतो, काही महिने निद्रिस्त असलेली बाग फिरून जीवंत भासते आणि हेच स्थित्यंतर आठवणीतून मुक्तछंदात उतरतं!
Continue reading “बाग”

संक्रांत

शहराच्या मध्यभागी वडिलोपार्जित इस्टेट. सगळी भावंडे आपापल्या वाटणीच्या हिश्शात सुखाने संसार करत होते. म्हणाल तर स्वतंत्र तरी सुखदुःखात लागलं तर एकत्र. त्यातलंच हे एक चौकोनी कुटुंब. साहेबांची नोकरी, बाई गृहिणी. त्यांना दोन मुलं. मोठा मुलगा आईसारखा. गोरापान, दिसायला अगदी राजबिंडा. धाकटा मुलगा थोडा सावळा पण स्मार्ट. दोघेही हुशार. मोठा मुलगा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला शिकायला मुंबईला. धाकटा, नुकताच स्थानिक इंजिनीरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवलेला.

Continue reading “संक्रांत”

केसरगंध

Homegrown Saffron
‘गुलाबी थंडी, पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा आणि काश्मीर… केशराच्या कोमल फुलपाकळ्यांतून पाझरणारा शीतल शशीप्रकाश! अविस्मरणीय असं दृश्य…’ हे वर्णन काही वर्षांपूर्वी कुठेसं वाचलं होतं.

Continue reading “केसरगंध”

श्रीगणेश विसर्जन

Dagdu Sheth Halwai pratikruti murtiत्यांचं चौकोनी कुटुंब. आई, बाबा आणि ती दोघं बहीण भाऊ. शाळेतून आली की दप्तरं टाकून बाहेर खेळायला… आज घरी आली ती नाचतच. त्यांच्या जवळ नव्याने झालेल्या इमारतीमुळे त्यांना खेळायला नवे सवंगडी मिळाले होते. नाही म्हणायला आसपासच्या चार पाच स्वतंत्र बंगल्यातली मुले होती तरी नव्याने झालेल्या इमारतीत एकूण ७-८ कुटुंब राहायला आली आणि खेळायला भरपूर मुलं जमली. आज तर तिथल्या एका काकांनी सामायिक वर्गणी जमवून छोटासा सार्वजनिक गणपती बसवूयात म्हणून प्रस्ताव मांडला होता आणि बच्चाकंपनीच्या उत्साहाला उधाण आलं होतं. सगळे घरच्यासारखे, आपुलकीच्या भावाचे… साधंसच पण खूप धमाल आली, पहिल्या वर्षी!

Continue reading “श्रीगणेश विसर्जन”