शिल्पकार तूच आहेस तुझ्या जीवनाचा!

veena_ganesh[1]कोण्या एका नगरीत एक शिल्पकार होता. तो स्वतः दगडातून सुंदर मूर्ती बनवायचा. आपल्या घडवलेल्या त्या कलाकृती घेऊन एकदा तो राजाकडे गेला. आपली सगळी शिल्पे त्याने दरबारात प्रस्तुत केली. त्याच्या अप्रतिम कलाविष्कारावर सारा दरबार बेहद खूष झाला. राजाने त्या शिल्पकारास यथोचित भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि विचारलं, “ओबडधोबड दगडातून इतकी सुंदर शिल्पे तू कशी बनवलीस”? राजाच्या प्रश्नावर शिल्पकाराने नम्रपणे उत्तर दिले, “महाराज, मी फारसे काहीच केलेले नाही. प्रत्येक दगड वरून ओबड-धोबड दिसतो खरा; पण त्याच्यात कुठेतरी छानसं शिल्प हे लपलेलं असतं. मी फक्त दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला आणि आपोआप त्याच्या अंतर्यामी दडलेलं शिल्प दृश्य स्वरूपात प्रगट झालं, इतकंच!”

जे ‘दगडा’चं ‘शिल्पा’शी नातं तेच आहे व्यक्ती आणि व्यक्तिमत्वाचं. जसं एखादं उमललेलं सुंदर फूल कळीला विचारतं, “मी कोठून आलो”? कळी म्हणते, “तू माझ्यातूनच येतोस. मी जेव्हा आतून फुलून येते तेव्हा तू जन्मतोस एक बहारदार उमललेलं फूल बनून!”
सर्वसाधारण व्यक्तीमधून असाधारण व्यक्तिमत्व कसं उभं राहू शकतं याचं गम्य मला वरच्या गोष्टींमध्ये सापडतं. व्यक्ती म्हटलं की रंग, रूप या बाह्य गोष्टी असतात. पण त्याबरोबरच व्यक्ती ही शुद्ध आचार, तर्कसुसंगत विचार, देहबोली, हुशारी, शिक्षण, संस्कार, ऋजुता, विवेक अशा अनेक पैलूंनी फुलून आलेल्या व्यक्तिमत्वामुळे अधिक आकर्षित भासते. घडलेलं प्रसन्न, प्रफुल्ल, व्यक्तिमत्व हाच खऱ्या आनंदी जीवनाचा पाया असतो.
आपण ठराविक मोठे झालो की स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरतो. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपण जसे बोलतो, वागतो, त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडत असते. राजहंस जसा पाणीमिश्रित दूधातूनही बरोबर दूधच निवडतो त्या नीरक्षीरविवेकबुद्धीने जर चांगलं तेच उचललं, कायम तो प्रयत्न ठेवला तर आपल्या व्यक्तिमत्वाचं ‘शिल्प’ घडवणं आपल्याच हातात आहे.
एखादं वर्तुळ काढायचं असेल तर हवा बिंदू. व्यक्तिगत व्यक्तिमत्व विकास झाला बिंदू. आपण एका समाजात जन्म घेतो, वाढतो. चांगलं व्यक्तिमत्व जसं आनंदायी असतं तसंच आपण ज्या समाजात राहतो तो ही उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणूनच व्यक्ती-विकासातून कुटुंब-विकास, समाज-विकास आणि पुढे राष्ट्र-विकास हे मोठे वर्तुळ निश्चित शक्य आहे. अशा विकसित समाज राष्ट्रातले जीवन घडविणे आपल्या सर्वांच्या हाती आहे…
याचसाठी “शिल्पकार तूच आहेस तुझ्या जीवनाचा”!
.
~ सायली मोकाटे-जोग
सप्टेंबर २०१०

5 thoughts on “शिल्पकार तूच आहेस तुझ्या जीवनाचा!

  1. Farach chan Sayali. But many individuals never understand their hidden qualities and try to live in this glamours selfish world forever. as it isThey need some master to guide them and here a place of GURU in your life is important. May GOD bless you all..

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s