मैफल

हल्ली ती अधूनमधून चक्क बायकोसारखी वागते
एवढ्या तेवढ्यावरून नवऱ्याला एकदम धारेवर धरते

तो चक्रावतो बुचकळ्यातही पडतो
त्याचं असं झालं की तिलाही चेव चढतो

मागचं काहीबाही काढून थोडी ती धुसफुसते
त्याला कळतच नाही त्याचे काय चुकते?

तरी गप्प राहून तो घेतो सगळं ऐकून
सवाल पेट का करतो काय कोणाला काही सांगून?

जरा वेळाने मग तिलाच करमत नाही
त्याचा चेहरा तिला अजिबात बघवत नाही

ती उठते आधण ठेवते बनवायला फक्कड चहा
डोकं दुखतंय का रे, हा बाम जरा चोळून पाहा

बोलण्याच्या प्रयत्नाला भिडतो अबोल गुस्सा
पळवायला हा रूसवा काय बरं करावा बेत खासा?

वाफाळत्या चहासोबत ती मांडते चटकदार बश्या
पेल्यातलं विरून क्षणात पिकतो छानसा हशा

तू रागावत जाऊ नकोस गं असं
प्रश्न पडतो तुला मनवावं तरी कसं?

तुझ्याविना माझे काही चालत नाही राणी
चल, तुझ्यासाठी मस्त गातो मी गाणी

मनिषा तिची होते अखेर सफल
निमित्ताविना जेव्हा घरी रंगते धुंद मैफल!!

.
~ सायली मोकाटे-जोग
एप्रिल २०१८

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s