बाग

बागेची मनापासून आवड असणाऱ्यांना भारत आणि अमेरिकेतला मोठा फरक जाणवतो तो हिवाळा आला की. फुललेली बाग, शिशिराची पानगळ, गारठवणारी थंडी ते बर्फाच्छादित असं बदलत जाणारं हवामानरूप सरून पुन्हा वसंत जेव्हा पालवतो, काही महिने निद्रिस्त असलेली बाग फिरून जीवंत भासते आणि हेच स्थित्यंतर आठवणीतून मुक्तछंदात उतरतं!

फळाफुलांनी डवरली
भाजीपाला बाग बहरली
लगडले रसाळ पीच
अवीट गुणे ती चाखली

लटकती दोडकी दुधी
मिरची कारली काकडी
टोमॅटो आळू घेवड्यासवे
पालक चुका अंबाडी

बेझिल पुदिना कढीपत्ता
आणिती लज्जत न्यारी
झुकिनी भेंडी कोहळ्यांसम
राजमा चवळी मटार मोहरी

चविष्ट रानभाज्या
तृप्त करी निसर्ग ठेवा
परसदारीचा विषमुक्त
हा रसगंधयुक्त मेवा

फुलती रंगीन बन ते
झेंडूंचे सहस्रावरी
कर्दळ गुलाब झेनिया
जास्वंद मोगरा जाई

रॅनॅकुलस डेलिया
ऍमारिलसचे कंद
डॅफोडिल लिली
करी केशर हा धुंद

डियांथ्रस बेगुनिया
अंगणीची सदाफुली
सडा नक्षत्रांचा दारी
सुखवे हरित पालवी

फुलली किती ती फुले
पिकल्या अनेक भाज्या
बदलते ऋतुचक्र येई
उत्सव पानगळीचा

सुकली अबोल सारी
मोसम हिवाळ्याचा
गोठलेले दवबिंदू अन्
थिजलेली तरुलता

फुटतील नवे धुमारे
फिरून येईल वसंत
पाखरे वल्लरी
मोहरून आसमंत

छंद आवडीचा मनी
बरसेल आनंद नित
गाईल बाग माझी
नव्याने चैतन्यगीत…

~ सायली मोकाटे-जोग
डिसेंबर २०१८
blue-bonnets-azalea
वसंत ऋतू आगमनाबरोबर आमच्या बागेत फुललेले टेक्सास ब्लू बॉनेटस् आणि अझेलिया
Spring time Texas Blue Bonnets and Azalea bloomed in our garden

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s