Festive

नवरात्री… अंगणातल्या झेंडूला भरभरून बहर. दसऱ्याच्या दिवशी तर ऊतू आल्यासारखी. झेंडूच्या वासाखेरीज दसऱ्याची सकाळ वाटतंच नाही. टोपल्यांनी वेचला पहाटे, तरी फुललेल्या बागेची परडी तशीच! भरगच्चं हार, सगळीकडची पूजा करून वर एक छोटी बास्केट ती ऑफिसमध्ये नेली. सहकारी मैत्रिणींनी उत्साहाने खोलीच्या सगळ्या खिडक्यांमध्ये झेंडूच्या माळा ठेवल्याप्रमाणे सजवली, फुलांची रांगोळी काढली. बॉसने कुतूहलाने फोटो काढले. आजूबाजूचे देशी लोकही खूष… Feeling festive!

Continue reading “Festive”

बाग

बागेची मनापासून आवड असणाऱ्यांना भारत आणि अमेरिकेतला मोठा फरक जाणवतो तो हिवाळा आला की. फुललेली बाग, शिशिराची पानगळ, गारठवणारी थंडी ते बर्फाच्छादित असं बदलत जाणारं हवामानरूप सरून पुन्हा वसंत जेव्हा पालवतो, काही महिने निद्रिस्त असलेली बाग फिरून जीवंत भासते आणि हेच स्थित्यंतर आठवणीतून मुक्तछंदात उतरतं!
Continue reading “बाग”

केसरगंध

‘गुलाबी थंडी, पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा आणि काश्मीर… केशराच्या कोमल फुलपाकळ्यांतून पाझरणारा शीतल शशीप्रकाश! अविस्मरणीय असं दृश्य…’ हे वर्णन काही वर्षांपूर्वी कुठेसं वाचलं होतं.

Continue reading “केसरगंध”

केसरिया

“केसरिया, अरे, काय दशा करून घेतली आहेस तू? नाही झालं रे, तीन दिवस तुझ्याकडे बघायला. माझ्या पण चिमण्या आहेत ना घरात. एकाअर्थी, चुकलंच माझं. बघ ना, चांगले चार-पाच दिवसाचे पर्जन्यमान होते म्हणून खरं उचललं तुला. नेमका हुलकावणी देऊन हा पाऊस गायब झाला आणि तू असा उन्हात ताज्या जखमेबरोबर. पण आलंय ना आता माझ्या लक्षात… हे बघ, मला माहिती आहे, तू तग धरून आहेस…
Continue reading “केसरिया”

चवळी

चवळीकाही दिवसांपूर्वी चवळी काढली आणि लक्षात आलं, चवळीला भुंगा लागलाय. कडधान्यं मी शक्यतो फ्रिजरमध्ये टाकते म्हणजे किडे-भुंग्यांचा त्रास होत नाही. नेमकी ही नवी आणलेली चवळी गडबडीत बाहेर राहून गेली. संपवायच्या दृष्टीने मग मी ती सगळीच भिजवली. ‘रोजच्या व्यस्त वेळापत्रकात विसरघोळ घातला की हे असं पुढे काम वाढतं’… डोक्यातल्या विचार भुंग्यासोबत भिजलेली चवळी पटापट निवडायला घेतली. नेहमीसारखा खराब भाग बाजूला काढून उरलेलं दल घेण्याची काटकसर बाजूला ठेवत मी भुंगा लागलेल्या सगळ्या आख्या चवळ्याच बाजूला काढल्या आणि पुढच्या स्वयंपाकाला लागले.

Continue reading “चवळी”

सेलेरी, ढबू मिरची आणि गुलाब!

तुम्ही म्हणाल, ‘हे काय भलतंच?’ त्याचं असं झालं, परवा सेलेरी घेतली सुपासाठी. कापून त्याचा बुडखा पाण्यात ठेवला तर मुळं फुटून घरच्याघरी सेलेरी उगवते. पण इथे स्वयंपाकाच्या घाईत तो बुडखा ठेवायला भांडंच मिळे ना! मग काय, दिवाणखान्याच्या बाजूनी ओट्यावर काचेचा सट होता. बरेचदा बागेतल्या फुलांचा गुच्छ करून मी त्यात ठेवत असते. नेमका तो रिकामा होता. दिला चटकन सेलेरीचा बुडखा त्यात ठेवून.

Continue reading “सेलेरी, ढबू मिरची आणि गुलाब!”