संक्रांत

शहराच्या मध्यभागी वडिलोपार्जित इस्टेट. सगळी भावंडे आपापल्या वाटणीच्या हिश्शात सुखाने संसार करत होते. म्हणाल तर स्वतंत्र तरी सुखदुःखात लागलं तर एकत्र. त्यातलंच हे एक चौकोनी कुटुंब. साहेबांची नोकरी, बाई गृहिणी. त्यांना दोन मुलं. मोठा मुलगा आईसारखा. गोरापान, दिसायला अगदी राजबिंडा. धाकटा मुलगा थोडा सावळा पण स्मार्ट. दोघेही हुशार. मोठा मुलगा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला शिकायला मुंबईला. धाकटा, नुकताच स्थानिक इंजिनीरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवलेला.

Continue reading “संक्रांत”

श्रीगणेश विसर्जन

Dagdu Sheth Halwai pratikruti murtiत्यांचं चौकोनी कुटुंब. आई, बाबा आणि ती दोघं बहीण भाऊ. शाळेतून आली की दप्तरं टाकून बाहेर खेळायला… आज घरी आली ती नाचतच. त्यांच्या जवळ नव्याने झालेल्या इमारतीमुळे त्यांना खेळायला नवे सवंगडी मिळाले होते. नाही म्हणायला आसपासच्या चार पाच स्वतंत्र बंगल्यातली मुले होती तरी नव्याने झालेल्या इमारतीत एकूण ७-८ कुटुंब राहायला आली आणि खेळायला भरपूर मुलं जमली. आज तर तिथल्या एका काकांनी सामायिक वर्गणी जमवून छोटासा सार्वजनिक गणपती बसवूयात म्हणून प्रस्ताव मांडला होता आणि बच्चाकंपनीच्या उत्साहाला उधाण आलं होतं. सगळे घरच्यासारखे, आपुलकीच्या भावाचे… साधंसच पण खूप धमाल आली, पहिल्या वर्षी!

Continue reading “श्रीगणेश विसर्जन”

रैना

“ते तुमचं ऑर्कुट किंवा फेसबुक का काय आहे तिथे बघूया का?” अपर्णानी आशिषला सुचवलं. “सोशल साईट्स, गुड ऑपशन!” आईच्या बोलण्यावर आशिषनं शोधायला सुरुवात केली. नाव टाकलं. खाली आलेल्या अनेक प्रोफाईल मधून तो बारकाईने बघू लागला.

Continue reading “रैना”