छंद मराठी बंध मराठी

Chhand_Marathi_Bandh_Marathi“सूर्य म्हणजे ना, तो एक अग्नीचा गोळा असतो.”
“हो? ‘अग्नी’चा? बापरे!”
“होS”
माझ्या स्वरातलं आश्चर्य लक्षात न येऊन लेकीनं जोरदार होकार भरला.
“पण तू ते इंग्रजीत कसं सांगितलंस शाळेत? म्हणजे ‘अग्नीचा गोळा’ हा शब्दप्रयोग तू इंग्रजीत कसा व्यक्त केलास?” (अचंबित) मी प्रश्न टाकला.
“अं… Sun is like a fire ball… असं सांगितलं मी”… एरवी मराठीचा आग्रह धरणारी आई आज चक्क इंग्रजीत सांगायला का सांगतेय असं वाटून खांदे उडवत लेक म्हणाली.
Continue reading “छंद मराठी बंध मराठी”

श्रीगणेश विसर्जन

Dagdu Sheth Halwai pratikruti murtiत्यांचं चौकोनी कुटुंब. आई, बाबा आणि ती दोघं बहीण भाऊ. शाळेतून आली की दप्तरं टाकून बाहेर खेळायला… आज घरी आली ती नाचतच. त्यांच्या जवळ नव्याने झालेल्या इमारतीमुळे त्यांना खेळायला नवे सवंगडी मिळाले होते. नाही म्हणायला आसपासच्या चार पाच स्वतंत्र बंगल्यातली मुले होती तरी नव्याने झालेल्या इमारतीत एकूण ७-८ कुटुंब राहायला आली आणि खेळायला भरपूर मुलं जमली. आज तर तिथल्या एका काकांनी सामायिक वर्गणी जमवून छोटासा सार्वजनिक गणपती बसवूयात म्हणून प्रस्ताव मांडला होता आणि बच्चाकंपनीच्या उत्साहाला उधाण आलं होतं. सगळे घरच्यासारखे, आपुलकीच्या भावाचे… साधंसच पण खूप धमाल आली, पहिल्या वर्षी!

Continue reading “श्रीगणेश विसर्जन”

९/११

सप्टेंबर २००१. आमच्या महाविद्यालयीन बास्केटबॉलच्या मॅचेस जवळ आलेल्या असल्यामुळे आम्ही रोज सकाळी सरावाला सोलापूरच्या होम मैदानावर जमायचो. १२ सप्टेंबर २००१ ची सकाळ… दूरदर्शनवर बातम्या चालू होत्या. पायात बूट चढवताना मी डोळे बातमीकडे वळवले. चित्रात नजिक उभ्या २ उंच इमारती दिसत होत्या. पैकी एक इमारत डोक्याला जबर दुखापत झाल्यासारखी भासत धूर ओकताना दिसत होती, आणि त्याचवेळी नेम धरून वेगाने येणारे एक विमान एखाद्या उंच्यापुऱ्या व्यक्तीला कोणी पोटाच्या थोडं वर भोसकावं तसं त्या बाजूच्या दुसऱ्या इमारतीत दाणकन आदळताना दिसलं… प्रचंड स्फोट, ज्वाला आणि काळा धुराचा कल्लोळ!

Continue reading “९/११”

अब तक ..

बाळलीला, किशोरावस्था, सुरवंटाचं पाखरू असं होत पंचविशी आली की असणारा ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ असा जोश आणि खळखळाट, तिशी आली काहीसा समजदार बनतो. संसार, मुलं, जगरहाटी, भलंबुरं यासोबत स्थिरता, संथता याचीही काही प्रमाणात भर पडत असावी. तिशी ओलांडून पस्तीशीकडे वळताना प्रकृती व वाढतं वय अशी दोन्हीची स्थित्यंतरं फारशी जाणवत नसल्यामुळे असेल कदाचित, पण ‘अजूनही यौवनात मी’ हा फील राहतो. पस्तिशी ओलांडून चाळीशीत पोहोचताना मात्र काही आयुष्य मागे सरल्याचा आतवर कुठेतरी शोध चालू होत असावा. चाळीशी ते पन्नास पंचावन्न… संसारातून, मुलांमधून फुरसत आणि बरीचशी स्वावलंबी. फुरसतीच्या, मनस्वी इच्छेच्या अनेक गोष्टी करायला जमतील अशी…. साठीत सकृतदर्शनी निवृत्तीचे वेध, आजी-आजोबांच्या भूमिका, तरी त्यातही करण्यासारखे बरेचसे. सत्तर पंच्याहत्तरीनंतर स्वास्थ जपणूक, छंद सोबती, वानप्रस्थी अलिप्तता, अनुभवाचं भरभरून दान, गत आयुष्याचा आढावा, मुद्दाम येणाऱ्या आठवणी… असं बरंच काही!

Continue reading “अब तक ..”

माय मराठी

maayboli“ही मराठी कथा मागे सरकलीये की पुढे सरकतेय हे बघायला ही बया सरकारी शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला गेली हो…!! “. व. पुं. च्या ‘भदे’ कथानकातली ‘कमला सोनटक्के’ या पात्रावरची ही ओळ आठवायला तसं खास कारण घडलं. मागच्या डिसेंबरमध्ये २ महिन्यांसाठी मी भारतात गेले होते. सोबत ऑफिसचे कामही होते. माझ्या पावणे दोन वर्षाच्या लेकीला अर्धा दिवस बालवाडीत ठेवावं असं घरी ठरलं.

Continue reading “माय मराठी”

उंची

earthमाझ्या आठवणीप्रमाणे उंचीचं वेड मला लहानपणापासूनच लागलं असावं. पक्षाप्रमाणे उंच भरारी मारत आकाशाला गवसणी घालायचं स्वप्न अनेक रात्रींतून मी स्पष्टपणे पाहिलेलं. स्काय डायविंगमध्ये १०,००० फुटावरून उडी मारताना केवढा आनंद भरून आला होता म्हणून सांगू? थंड हवेतून ढगांमधून खाली येताना बोन्सायप्रमाणे दिसणारा निसर्ग आणि लिलिपुटमधली माणसे… पॅराशूट उघडून हवेवर तरंगण्यातली मौज शब्दात नाही सांगता येणार! भीतीचा लवलेश सोडाच पण इच्छापूर्तीचा, त्या उंचीवर जाण्याचा आनंद भरून होता.

Continue reading “उंची”

मिलाप पिढ्या संस्कृतींचा

diwali-halloweenऑफिसच्या सांस्कृतिक समितीची (Cultural Committee) बैठक चालू होती… ऑक्टोबर २०१४ चे सण दिवाळी आणि हॅलोवीन. दिवाळीविषयी माहिती देताना समन्वयक म्हणाली, “Diwali is Hindu festival. Its celebration of light over darkness, good over evil… and then on Oct 31 we have Halloween which is…” आणि खोलीतले एकमुखाने बोलून गेले… “which is opposite of Diwali!” विरोधाभासातून हास्य आणि विनोद निर्मिती झाली आणि मला एकदम २०१३ ची घटना आठवून गेली…

Continue reading “मिलाप पिढ्या संस्कृतींचा”

नमो

Shri Narendra Modiन्यूयॉर्क – मॅडिसन स्केअर गार्डन, २८ सप्टेंबर २०१४ च्या भाषणात पंतप्रधान मोदींनी बोलताना एक उल्लेख केला होता… ‘१६ मे २०१४ लोकसभेचे निकाल पाहात इथे बसलेल्या तुमच्यापैकी अनेकजण ती रात्र जागले असतील’… १५ मे २०१४ ची रात्र जागणाऱ्या अमेरिकास्थित अनिवासी भारतीयांमध्ये मी ही होते. आधी निकालांची धकधक आणि नंतर संपूर्ण बहुमत मिळाल्याच्या आनंदात माझी झोप कुठल्याकुठे पळून गेली होती. दुसऱ्या दिवशी पांढरा कुर्ता आणि भगवी ओढणी घालून मी ऑफिसमध्ये गेलेली… ‘जड डोळे, किंचित थकवा तरी प्रचंड उत्साह’ अशी!

Continue reading “नमो”