नयनरम्य संध्याकाळ

“केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचारण, मनुजा चातुर्य येतसे फार!” फिरण्याची मनस्वी आवड. मार्च २००८ मध्ये टोरोंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना खालच्या शुभ्र बर्फाच्छादित कॅनडाचं दर्शन झालेलं. एप्रिलमध्ये कॅनडा वंडरलंड, CN Tower, नायगरा या ठिकाणी भेटी झाल्या. मे मध्ये टोरोंटो ‘सेंट्रल आयलंड’च्या भ्रमंतीचा योग आला.

Continue reading “नयनरम्य संध्याकाळ”

गड्यांनो, फेकुनी द्या दप्तरे !…

१९९०-२००० च्या दशकातलं महाराष्ट्रातलं शिक्षण हे अगदी पु. लं. च्या ‘बिगरी ते मॅट्रीक’ सारखं खडतर (राकट मास्तर आणि त्यांच्या छडीचा भरपेट मार) असं निश्चितच राहिलं नव्हतं. त्यात थोडी मुलायमता आलेली होती. स्वातंत्रोत्तर भारताची मोकळी मानसिकता होती. अर्थात ‘मेकाले’ प्रणालीत फारसा फरक सरकारकडून पडलेला नसला तरी शहरी सुखवस्तू घरातले पालक मुलांच्या अभ्यास-प्रगतीकडे जातीने लक्ष देऊ लागले होते. धाक, शिक्षा हे होतं पण तरीही शिक्षकांविषयीची अनाठायी वाटणारी भीती कमी झाली होती.

Continue reading “गड्यांनो, फेकुनी द्या दप्तरे !…”

हार्टफोर्ड ते मॉरिसप्लेन्स

अमेरिकेतल्या माझ्या पहिल्या वहिल्या प्रवासाचा हा किस्सा आहे. अभियांत्रिकीनंतर सोफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली आणि दोन वर्षात अमेरिकेला येण्याची संधी मिळाली. अमेरिकेच्या त्या पहिल्या भेटीतली ही घटना. एप्रिल २००६. मी न्यूजर्सीमध्ये मॉरिसप्लेन्सला राहत होते. तिथून हार्टफोर्डला मैत्रिणीकडे जायचा बेत होता. त्यासाठी ऍमट्रॅकचं बुकिंग केलं.

Continue reading “हार्टफोर्ड ते मॉरिसप्लेन्स”